आमच्या दादाच्या लग्नात वहिनीला उखाणा घ्यायला सांगितला तर ती म्हणाली मला असलं काही येत नाही. दादाला म्हणाली 'मी पोषाख कुठला घातलाय बघ आणि या बायका मला नाव घ्यायला सांगतायत'. मग घरातल्या वडीलधाऱ्या बायका खूप मागे लागल्या तर तिने एका मुस्लिम मैत्रीणीने पढवलेला उखाणा घेतला, 'धीरज है मेरा सलोना दीर... सूरज को मै मिली ये है उसकी तकदीर'.
गडबडीत कोणाचेच लक्ष नव्हते पण तिने उखाणा घेतला म्हणून तिचे खूप कौतुक झाले.