आत्म म्हणजे मी -स्वतः आणि स्वतःवरील विश्वास म्हणजे आत्मविश्वास!  "हो! हे मी करू शकतो; नि:संशय!"  ही भावना म्हणजे आत्मविश्वास! तो येतो अभ्यासाने, कौशल्य प्राप्त केल्याने!

हा इहवादी विचार!

"नैनं छिंदंती शस्त्राणी......" मध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या गोष्टी सांगितल्या आहेत. लौकिक जीवनाशी त्यांचा क्वचितच संबंध असेल!

'भस्मिभूतश्च देहस्य, पुनरागमनं कुतः" हे चार्वाकाचे मत मानणारे आम्ही! जो पर्यंत या पृथ्वीतलावर आहोत, तो पर्यंत आम्हास आत्मविश्वासाची नितांत गरज आहे!