आज निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढला आहे, तो कोण करतो ? स्वतः खासदार किंवा आमदार. मग हे पैसे येणार कुठून ? हे पैसे जमा करायचे असेल तर निस्वार्थ काम करण्यापेक्षा "पैसे" घेउन काम करण्याची प्रवृत्ती वाढली.

जर सरकार सर्व खर्च करणार असेल तर थोडंफार तुम्ही म्हणता तसं गुणपत्रिका बनवता येइल. लेखात म्हटल्याप्रमाणे "पंतप्रधान निधितुन" केलेल्या खर्चाची जाहीरात खासदार करतात हे टाळता येइल.

बाकी आपण स्वतः खासदारांनी कोणतं काम केल या पेक्षा काय लफडी केली हे ऐकण्यात अधिक रस घेतो असं मला वाटतं. हा माध्यमांचा दोष, की आपलया खासदारांची किंवा सरकारची प्रसारयंत्रणा कमी पडते ?

चांगला विषय निवडल्याबद्दल अभिनंदन.