हिंदाळलेले मराठी भयानक वाटते. खरे तर या लेखासाठी मराठमोळे शब्द वापरणे अवघड नव्हते.
असो, लेखकाच्या वतीने आमचा प्रयत्न !
हे सर्वोत्तम भाषांतर नाही. काही चुका राहिल्या असतील.
(फ्रेंड ऍण्ड डिव्होटी ऑफ मराठी)
अभिरत
नमस्कार,
लवकरच भारताचे नागरिक नवीन सरकार निवडणार आहेत. ह्या वेळेस भारताच्या निवडणूकीचा खर्च अमेरिकेत झालेल्या निवडणूकीपेक्षाही जास्त राहणार आहे. अशा वेळेस मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य बनते. कोणाला करायचे ही त्यांची इच्छा.
मला नुकतीच एका नव्या कार्यक्रमाची माहिती मिळाली. मला वाटले की मी ती सगळ्यांना सांगावी. ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच फायदा होईल. भारताला नवी दिशा देण्यासाठी भाजपाच्या विचारसरणीवर आधारित एक नवीन मंडळ (??) स्थापन करण्यात आले आहे. आज भारताला पुढे जायचे असेल तर सरकार बदलण्याची निकडीची गरज आहे.
ह्या मंडळाचे नाव आहे - फ्रेंडस ऑफ बीजेपी!
युपीएला ५ वर्षांपूर्वी "बूमींग इकॉनॉमी" मिळाली होती, प्रत्येकाच्या खूप अपेक्षा होत्या. आज जर भारताची स्थिती पाहिली तर आपण प्रगतीच्या पायऱ्या उतरत आहोत. सध्याच्या सरकारामुळे शेतकरी असो, सैनीक असो की नागरिक प्रत्येक जण त्रस्त दिसतो. फक्त स्वतःची व्होटबँक वाचवण्यासाठी भारताला दुर्बळ करणे, हा सर्वात मोठा देशद्रोह आहे. अफजल गुरुला फाशी देण्याचा विषय आला की त्याआधी राजीव गांधीचा खुनी रांगेत आहे - हे कारण सांगणे... काय चालले आहे? त्या दहशतवाद्याची कातडी वाचवण्याची देशाला काय किंमत द्यावी लागते आहे ह्याचा काही विचार करेल की नाही कोणी? तालीबान आज आपल्या सीमेपासून फक्त ५० कि.मी. दूर आहे, काय करत आहोत आपण त्या बद्दल?
एक गोष्ट खरी की सध्याच्या सरकारच्या भरोश्यावर राहीलो तर भारताचा लवकरच सोमालीया बनणे सहजशक्य आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ एकाच परिवाराचे सदस्य फक्त पंतप्रधान बनतील असा असेल, तर तो अर्थ आज आपणास बदलावा लागेल.
ज्यांना भाजपची विचारसरणी मान्य आहे, त्यांना माझे निमंत्रण - टिचकी मारा - दुवा क्र. १
यूट्यूबवरही तुम्हाला काही छान व्हिडीयो मिळतील