आपल्या सर्वांच्या शरीरात असलेला आत्मा एकच आहे तर आपल्या सर्वांचे स्वभाव, बोलणे, वागणे वेगवेगळे कसे? बोलणे, वागणे, एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देणे इ. नाशवंत शरीराचे काम असे समजले तर मग आत्मा नक्की काय करतो?

आणि हे सर्व आत्मा करतो असे मानले तर मग आपल्या सर्वांच्या ठायी एकच असलेल्या आत्म्याच्या प्रतिसादात फरक का?

हे प्रश्न मी मनापासून, जिज्ञासू वृत्तीने विचारले आहेत. आपल्याला विरोध करण्याचा कोणताही हेतू त्यात नाही.