"सत्य म्हणजे या व्यक्त त्रिमीती जगाची चौथी मीती, अनंत पोकळी, सार्वभौम व्यापकता. या व्यक्त जगाच्या सिनेमाचा पडदा. कोणत्याही अभिव्यक्ती साठी सत्त्याची उपस्थिती अनिवार्य आहे, जसा सिनेमा पडद्या शिवाय दिसू शकणार नाही तसे सत्या शिवाय या जगातले कुठलेही प्रगटी करण शक्य नाही. त्यामुळे सत्य हे प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या आत, बाहेर, सर्वत्र आणि चराचर व्यापून आहे म्हणून ते त्रिकालाबाधित आहे."
काही कळेल असे बोला राव!