आम्ही मर्त्य मानव! या मर्त्य जगातच वावरतो. या जगासाठी जे जे आवश्यक ते ते आत्मसात करतो. मानवी मनांसोबत खेळतो. त्यांचेच लाड पुरवतो; किंवा प्रसंग-परत्वे त्यांना खडसवतो देखील!
आत्मविश्वासाची गरज असते ती त्या लोकांना - जे या भू लोकी वावरतात. आम्हास जरुरी आहे -तुम्ही ज्याला कॉन्फिडन्स म्हणता त्या 'आत्मविश्वासा'ची! परलोकीचे ज्ञात नाही!
थोडक्यात मी म्हणजे 'मी' आहे; सर्वांच्या ठायी वास करणारा, अमर असा तथाकथित 'आत्मा" मझ्या परिचयाचा नाही!