चर्चा म्हणजे संवाद! मनुष्य प्राण्यास आपल्या मनातील विचार इतरांना कळवावे वाटतात. इतरांचे जाणून घेण्यची तीव्र इच्छा असते. कोण चूक कोण बरोबर हे महत्त्वाचे नाही! 'वादे वादे जायते तत्वबोध:' असे एक वचन ऐकिवात आहे. माणसाला सत्य नेमके जाणून घेण्याची जी लालसा आहे, ती कांही अंशी इथे पुरी होते!
चर्चा जशी आपण इतरांबरोबर करतो, तशीच स्वत: बरोबरही ती नित्य चालते! आणि हेच जिवंतपणाचे लक्षण होय!