ही भावना प्रत्येकाचीच असते. महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळात / कट्ट्यावर बसून, परिसंवादाच्या व्यासपीठावरून, वर्गात, जालावरून आपल्याला सतत काही ना काही म्हणायचं असतं. ते आपण म्हणतो. त्याला इतर अनेक उत्तर देतात. म्हणजेच कुणीतरी आपलं म्हणणं "ऐकून घेतं" पटो न पटो, तो वेगळा मुद्दा. आणि ही ऐकून घेतल्याची जाणीव खूप आनंददायक असते. चर्चेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चर्चेतून हा आनंद मिळत असतो.

अनेक माणसं अशी असतात की त्यांच्याकडे प्रभावी बोलण्याची कला नसते पण त्यांनाही मत व्यक्त करायची आस असतेच. अशी माणसं बोलू लागली तर कोणी कदाचित लक्ष देत नाही. पण जालाच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेचा फायदा त्यांना घेता येऊ शकतो कारण आपल्याला जे म्हणायचंय ते कोणाच्याही मध्येच बोलण्याचा अडथळा न येता म्हणता येतं. इतरांच्या म्हणण्याचा नीट वेळ घेऊन विचार करता येतो. आपलं मत कोणाला पटलं नाही तरी एकदम आपल्या आत्मविश्वासाला धक्का बसेल असं कोणी ताडकन आपल्याला "बोलून" दाखवत नाही.

हे झालं थोडंसं चर्चा करणाऱ्या माणसांच्या मानसिक फायद्याबद्दल. शिवाय श्रीकांत जोशी आणि हेमंत पाटील यांच्याशीही पूर्ण सहमत आहे.