ही व्यापकता जाणिवेनी परिपूर्ण आहे पण जर फक्त निराकार व्यापकताच असती तर ती स्वतःला कसे जाणणार? त्यामुळे या व्यापकतेने आकार निर्माण केला पण ती स्वतः ला आकारच समजू लागली (बघा आपण शरीर आहोत असे तुम्हाला वाटते की नाही? ) आणि आपण या शरीरात बंदिवान आहोत असे तीला वाटू लागले. मन हे ध्वनी निर्मीत असल्यामुळे व्यापकतेला आपल्या मूळ शांततेचे विस्मरण झाले, मग शब्द त्यांचे अर्थ त्यातून निर्माण होणाऱ्या भावना, नाती-गोती यानी हा कोलाहल वाढतच गेला (खरयं की नाही? ). पण निर्मीती ही या व्यापकतेची मूळ संभवना (पोटेंशियालिटी) आहे त्यामुळेच तर आपल्याला निर्मितीत आनंद वाटतो.
आत्मा हे आपले मूळ स्वरूप आहे, आपण सगळेच स्वतःला व्यक्ती समजत असल्यामुळे त्या स्वरूपाचे विस्मरण झाले आहे.
इथे आपण व्यापकता = आत्मा असे म्हटले आहे. म्हणजेच व्यक्ती आणि आत्मा हे दोन वेगळे नसून एकच आहेत. आपण (सजीवांनी) मात्र त्यात फरक केला आहे. बरोबर? म्हणजेच आपल्याकडून दिले जाणारे प्रतिसाद हे आत्म्याचे किंवा व्यापकतेचे आहेत किंवा आपण ज्याला शरीर किंवा व्यक्ती म्हणतो त्याचे आहेत.
तात्पर्य, आपण जे प्रतिसाद देतो ते आत्म्याचेच आहेत अर्थात आपल्या भाषेत व्यक्तीचे आहेत. इथपर्यंत समजले.
आता आपले दुसरे विधान,
प्रतिसादाचा वेगळेपणा हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे.
आता, व्यक्ती आणि आत्मा यात फरक नसताना प्रतिसादाचा वेगळेपणा हा व्यक्तीमत्वाचा भाग कसा काय? म्हणजे हा प्रतिसाद आत्म्याचाच होय. मग सर्व्यव्यापी आणि एकमेव अशा आत्म्याच्या प्रतिसादात सजीवागणिक फरक कसा काय असा माझा प्रश्न आहे.
तसेच आपल्याही उपरोल्लेखित दोन विधानांत तफावत नाही काय?