जरी तुम्हाला आपण आत्मा आहोत हे समजले तरी तुमचा देह, मन आणि प्रतिसाद शरीर जीवंत आहे तो पर्यंत असणारच.  तुम्ही ज्यातून बोलाल ते शरीर आणि आवाज वेगळा असला तरी ज्याला ही घटना कळते आणि ज्यातही घटना घडते तो निराकार एक आहे हा आत्म्याचा अर्थ आहे. माझा निर्देश त्या निराकाराकडे आहे. बाहेरून जरी आपण सगळे वेगवेगळे दिसलो तरी आतून एकच आहोत हा अस्तित्व एक आहे याचा अर्थ आहे. विविधता ही आत्म्याच्या प्रकटीकरणाची मौज आहे. प्रकटीकरण एकसारखे असते तर अस्तित्व निरस झाले असते.

तुम्ही एकच प्रष्ण बुद्धाला आणि कृष्णाला विचारलात तर त्यांचे प्रतिसाद वेगवेगळे असतील, ते काल आणि व्यक्तिपरत्वे भिन्न असतील पण ज्या आत्म्याकडे त्यांचा निर्देश असेल तो एकच असेल आणि आहे.

माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की आपण स्वतःला व्यक्ती समजलो आहोत आणि त्यामुळे बंधनात आणि चिंतेत आहोत. प्रत्येक प्रसंग हा हे व्यक्तिरुप टिकवण्याचीच धडपड आहे म्हणून तर 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे म्हंटले आहे. आपण आत्मा आहोत या विश्वासाने तुमचे सारे जीवन बदलून जाईल, तुमच्या प्रत्येक प्रतिसादात स्थैर्य येईल, तुम्ही निर्धोक आणि आनंदाने  जगू लागाल असा ह्या चर्चेचा हेतू आहे. मला गवसलेले मी तुमच्याशी शेअर करतो आहे. आपण जे मुळातच आहोत त्याची तुम्हाला खबर देतो आहे इतकेच