देशात इतरत्र असलेल्या आणि काश्मिरात असलेल्या दहशतींतला (लोकांना दहशत बसली या अर्थी) मला वाततं हाच फरक आहे. आपल्याला रोज भीती वाटते, त्यांना रोज मृत्यू बघावा लागतो.
एकूणच प्रश्न जुना असला तरी अलिकडच्या काही दुर्घटना (म्हणजे वाईट घटना या अर्थी. अपघात या अर्थी नव्हे.) आणि त्यावरचे तीव्र आंतरराष्ट्रीय पडसाद बघता हा प्रश्न तडास नेण्याची राजकीय इच्छाशक्ती शेवटी निर्माण झाली आहे असा भास तरी निर्माण झालाच आहे. युद्धाची बेगमी सुरू झलीच आहे. त्याने प्रश्न सुटेल की छुप्या नव्या रूपात अधिक विक्राळ होईल हा एक अनुत्तरित प्रश्न आहेच पण, यावर तोडगा नाही निघाला तरी कृतिशून्यता संपण्याची खरी आशा निर्माण झालेली आहे.......