खलील जिब्रानची एक अशीच छोटीशी रूपककथा आठवली. "तराजूच्या पारड्यांत जन्म मृत्यूच्या तागड्या घेऊन तो पृथ्वीशी खेळत बसलाय, मला वाटलं- त्याला कधी या खेळाचाच कंटाळा आला तर?" एवढीच कथा. ५-६ वाक्य मोजून. त्या कथेचा शेवट या वाक्यानं केलाय. भीतीचा चटका बसतो ते वाचून. तसा चटका बसला ही कविता, ही कल्पना वाचून. अर्थात हा भीतीचा नाही तर सृजनाचा चटका आहे. पण बघ ना विरोधाभास यातला.....