क्वचित्प्रसंगी (पुनर्विवाहाच्या बाबतीत) दोनदा, फारतर तीनदा. अपवाद खूप नसावेत. (द्रौपदी आणि एलिझाबेथ टेलर एवढे दोनच चटकन आठवतात. )
द्रौपदी ने पाच पांडवांशी एकदाच लग्न केले ना? पाचही जणांची नावे तिला एकाच उखाण्यात गोवता आली असतील.
सामान्यतः एका विवाहात कोणत्याही बाजूकडील उत्सवमूर्तीस (म्ह. वधूस किंवा वरास) एकच उखाणा घ्यावा लागतो असे वाटते.
लग्नानंतर बारशात किंव इतर कुठल्याही कौटुबिक समारंभात उखाणे घेतले जात असत. शिवाय हल्ली आदेश बांदेकरांकडून पैठणी मिळवायची असेल तरीही उखाणा घ्यावा लागतो असे दिसते...