ट्रेलर पाहिला. वर ऋचांनी म्हटल्याप्रमाणे "वेडात मराठे वीर दौडले.. फक्त सातच बाकीचे कुठे गेले? " हा महाराजांचा विनोद असेल (असे वाटले नाही ट्रेलर पाहून पण वाक्य भलतंच विनोदी आहे. ) तर - राजे आणि जिजाबाई पत्ते खेळत होते. जिजाबाईंनी टाळी वाजवली. एक हुजऱ्या येऊन म्हणाला "हुकूम सरकार" राजे म्हणाले - इस्पिक हा फालतू जोक आठवला. राजांना यापेक्षा बरा मान अपेक्षित आहे, निदान यापेक्षा सरस विनोद तरी.

तसेही पन्नाशीला पोहोचलेल्या, डोळ्याखालची कातडी ओथंबत असता काळ्याभोर दाढी-मिशा लावणाऱ्या महेश मांजरेकरला राजे म्हणून स्वीकारण्यासाठी विनोदाची उत्तम जाण हवीच. निदान राजे कोणता हेअरडाय वापरतात त्याची जाहीरातही करता येईल.  

असो. गरम तव्यावर पोळी भाजण्याचा उद्योग असेल तर मराठी माणसानेही मागे राहू नये. फक्त चित्रपटातून भलताच संदेश गेला नाही म्हणजे मिळवली.