प्रतिक्रियां याव्यात म्हणून तर विषय मांडला आहे; तेव्हा अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया येणारच! फकत प्रतिक्रिया देणाऱ्याने विषयाला धरून त्या द्याव्यात एवढी अपेक्षा ठेवायला हारकात नाही. माझे म्हणणे खोडून काढण्याचा हक्क प्रत्येक मनोगतीला आहेच!

श्री. संजय क्षिरसागरांची प्रतिक्रिया 'मला आकलन झाली नाही,'  असे सांगण्यात काहीच गैर नाही. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगावे एवढीच इच्छा!

 क्षिरसागर अध्यात्मात शिरतात. मी विषय मांडताना अध्यात्माच्या अंगाने न मांडता, व्यावहारिक पद्धतीने मांडला आहे. आजच्या  घडीला सर्व-सामान्या माणसाला  रोजच्या जगण्यासाठी (मृत्यूनंतरच्या स्थितीसाठी नव्हे) काय जरुरी आहे ते सांगण्याचा सरधोपट आणि बुद्धिवादी प्रयत्न आहे. बुद्धिवादी मृत्यूनंतर काय घडणार आहे याचा विचार करत नाहीत.

क्षिरसागरांनी तो अध्यात्माचा विषय बनवल्यावर मी दिलेली प्रतिक्रिया येणारच हे पुलस्ती सहित सर्व वाचकांनी ध्यानी घ्यावे. यात रागवण्यासारखे काहीच नाही!