'आत्मा सर्वांच्या ठायी एकच आहे, तो अमर आहे' ही विचारसरणी मानल्यावर मी ज्याला आत्मविश्वास (क्षिरसागरांच्या शब्दात कॉनफिडन्स) म्हणतो, त्याची गरजच उरणार नाही. मग मृत्यू आज आला काय किंवा शंभर वर्षांनी आला काय त्या अध्यात्मवाद्याला काहीच फरक पडणार नाही. स्वाभाविकपणे तो जगण्याबद्दल पूर्ण उदासीन असेल.
ज्याला भूतलावरील जीवन जगायचे आहे त्याला मात्र "नैनं छिंदंती शस्त्राणी' चा काडी मात्र उपयोग नाही. त्याने जगण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास (कॉनफिडन्स) मिळवण्यासाठी भूतलावरील नाना गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत हे उत्तम!