धन्य तो चित्रपट! धन्य ती मराठी अस्मिता (ही नेमकी कुठे असते?) आणि धन्य ते प्रेक्षक!
महेश मांजरेकरला शिवबांच्या भूमिकेत पाहून डोळ्याचे पारणे फिटले. आता वर जाण्यासाठी वैकुंठ नाही तर गेलाबाजार सिक्स सीटर मिळाली तरी खूप. 
वरील विनोद आम्ही वेगळ्या रूपात ऐकला आहे.
राजे आणि जिजाबाई पत्ते खेळत होते. तेवढ्यात जिजाबाइंचे लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या किल्ल्याकडे गेले. त्या म्हणाल्या, "शिवबा, हा किल्ला आमच्या मनात भरला आहे बघ. " तत्क्षणी शिवबांनी घोड्यावर स्वार होऊन किल्ल्याकडे धाव घेतली. तासाभराने परत येऊन म्हणाले, "मासाहेब, हा किल्ला तर आपलाच आहे. " मासाहेब म्हणाल्या, "माहित आहे रे. मला तुझे पत्ते बघायचे होते. "
हॅम्लेट