माननीय अतुल,
प्रत्येक बीमध्ये जीव असतोच त्याशिवाय त्यातून दुसरा त्यासारखाच जीव तयार होणं शक्यच नाही.
आता तुमचा मुद्दा असा की बी श्वास घेत नाही, हालचाल करीत नाही म्हणून ते सजीव नाही का? यावर माझं मत असं की:
जीव याची आपण व्याख्या त्याप्रमाणं करून घेतली आहे. ज्याला श्वास घेता येत नाही किंवा हालचाल करता येत नाही तो निर्जीव.
असं नाही.
आणि कोण म्हणतं बी श्वास घेत नाही. बी तसंच जर उघड्यावर ठेवलं तर ते सुकून जाईल. म्हणजेच त्याला एक विविक्षित वातावरण उपलब्ध असेल तरच ते जीवंत राहतं. या वातावरणपेक्षा वेगळं वातावरण त्याला मिळालं तर ते जीवंत राहणार नाही.म्हणजेच ते श्वासोच्छ्वास करतं. फक्त त्याला योग्य वातावरण आवश्यक आहे.
" भिन्न भिन्न तऱ्हेच्या जीवाला जीवंत राहण्यासाठी भिन्न भिन्न तऱ्हेच्या वातावरणाची आवश्यकता असते"
" ते मिळूनही जर त्यात काहीच फरक पडत नसेल तर तो निर्जीव असू शकेल"
-----------------------कृष्णकुमार द. जोशी