माझ्या मते बी सजीव नसते. कारण ज्याला आपण बी म्हणतो, ते निद्रित अवस्थेतील आदिमुळाचे, रुजण्यायोग्य परिस्थिती मिळेपर्यंत संरक्षण करणारे फक्त एक आवरण असते. जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स या वनस्पतींच्या वर्गीकरणाप्रमाणे , हे बी नुसतेच असते किंवा त्याच्याभोवती फळाचे आवरण असते. सुपरमॅनच्या कथेत तान्ह्या सुपरमॅनला जसं कॅप्सूलमध्ये घालून पृथ्वीपर्यंत पोचेपर्यंत तो सुरक्षित राहील याची काळजी घेतली गेली, तशी बी की एक कॅप्सूल किंवा यान असते. अंकुराला रुजण्यायोग्य परिस्थिती मिळाल्यावर, त्या अंकुराला स्वतःचे पोषण स्वतःला करता येईपर्यंत त्याला अन्नाचा पुरवठा होईल इतका अन्नसाठा त्यात साठवलेला असतो असे वाटते.
कृपया तज्ञांनी अधिक खुलासा करावा.
--अदिती