आपण शुन्यातून आलो आणि तिथेच जाणार आहोत तर ही मधली अवस्था कशाला निर्माण झाली? मी जर सुख-दुःखे, राग-लोभ चांगले-वाईट समान समजून जगायचे आहे तर मग जगायचेच कशाला? मग आपण ही चर्चा तरी कशाला करतो आहोत? तुम्ही आणि मी आतून एकच आहोत तर मी तुम्हाला विरोध करायला नाही पाहिजे.
तसेच मी (अर्थात आत्मा) अमृत आहे तर ह्या आत्म्याने वेगवेगळी शरीरे धारण करण्याचे आणि उगाचच प्रकटीकरणात वैविध्य आणण्याचे प्रयोजन काय? आणि प्रकट होण्याचे तरी प्रयोजन काय? ह्या पृथ्वीतलावरील एकही वस्तू निर्माण झाली असती किंवा नसती तरी कुणाला काय फरक पडणार होता?
माझा पहिला प्रश्न हाच होता की आत्मा करतो काय? सगळ्यांमध्ये सामावून गोंधळ घालत बसतो ! ऐहिक जीवनात उपयोगाची कोणती गोष्ट करतो? ती अशी की, काहीही झालं किंवा नाही झालं तर त्याच्या प्रभावामुळे झालं हे म्हणण्यासाठी प्रत्यक्ष न दिसणारी केवळ स्वानुभवाधारीत आधाराची खुंटी बनतो आणि पर्यायाने माणसांना परावलंबी बनवतो. ह्या पलीकडे आत्म्याचे (अस्तित्त्व असेलच तर) कर्तृत्त्व शून्य !
संजयजी,
मला वादाला वाद घालायचा नाही. चर्चेच्या अनुषंगाने माझे अनुभव, माझी मते मी आपल्याला सांगितली. ह्या चर्चेतून निष्पन्न काहीही होणार नाही. (निष्पन्न व्हावे असे मुळीच नाही) आपण आपल्या मताशी प्रामाणिक आहात तसाच मी माझ्या मताशी. त्यामुळे आपण एकमेकांना आपला मुद्दा पटवून देण्यापेक्षा आणि तेच तेच बोलण्यापेक्षा माझ्याकडून मी ह्या चर्चेला पूर्णविराम देत आहे.
धन्यवाद !