आपण शून्यातून आलो नाही किंवा आपण शून्यात जात नाही तर आपणच शून्य आहोत हा आत्म्याचा अर्थ आहे, जाते आणि हलते ते शरीर आणि मन.

जेंव्हा तुम्ही मला विरोध करता असे तुम्हाला वाटते तेंव्हा तुम्ही स्वतःचे स्वरूप (शून्यता) नाकारता.

शांतते शिवाय स्वर असू शकेल काय? ही शांतता म्हणजे शून्य, आत्मा, व्यापकता, सत्य, अमृत, तुमचे स्वरुप, या सगळ्या अस्तित्वाचा आधार. शब्द वेगळे असतील तरी अर्थ तोच आहे. पण नुसत्या शांततेत काय मजा? म्हणून अस्तित्वाचा हा उत्सव, हे प्रगटिकरण, हे संगीत. सुरू झालेले गाणे थांबायला हवे की नाही, नाही तर नवे गाणे सुरू कसे होणार? म्हणून मृत्यु!

आत्मा काय करत नाही? हा सूर्य त्याच्यात प्रकाशमान आहे, ही पृथ्वी आणि सारे ग्रह मंडल त्यात फिरते आहे, तुमचा श्वास त्यात चालू आहे, तुमचे हृदय त्यात धडकते आहे, हे सारे अस्तित्व त्यात प्रकट झाले आहे. आत्मा कर्तुत्वशून्य कसा असेल?

बुद्धाला जेंव्हा सत्य उमगले तेंव्हा तो म्हणाला: सत्य इतके प्रकट आणि डोळ्यासमोर होते की मीच माझ्या विचारात बुडून गेल्यामुळे ते मला दिसत नव्हते.  मी मला समजलेले सांगीतले. चर्चा ही प्रतिसादावर अवलंबून असते त्यामुळे काही हरकत नाही, धन्यवाद!