अदितीशी सहमत आहे. पण सहज आठवलं म्हणून एक गोष्ट सांगते. उपनिषदांत एक गोष्ट आहे. शिष्य गुरूला विचारतो ब्रह्म म्हणजे काय? तर त्याच उत्तर देताना संवादाच्या शेवटी गुरू शिष्याला एक बी फोडायला सांगतो. तसे केल्यावर विचारतो.
गुरू : हे बीज वृक्षाला जन्म देतं म्हणतोस, मग या बीजात तो वृक्ष दिसतोय का?
शिष्य : नाही.
गुरू : मग या बीजात काय आहे?
शिष्य : काही नाही.
गुरू : हे जे काही नाही म्हणतोस, तेच ब्रह्म.
ब्रह्म हे न सजीव न निर्जीव अशा स्वरूपाचं समजतात. त्या आध्यात्मिक आधारावर बी सजीव तर नाहीच पण निर्जीवही नाही असं म्हणता येऊ शकेल.