भक्ष्यासाठी वणवण करतो जालावरती
इलाज नाही, विडंबनाचे आह्निक आहे

निव्वळ अ - प्र - ति - म!

मिठी सोडता घोरत पडतो खुशाल मेला
नवरोबांची ओळख ही सार्वत्रिक आहे

वा! प्रामाणिकपणा भावला हो तुमचा!  

हात तिने हातात दिल्यावर नकोस थांबू
वाटायाचे तिला किती हा अरसिक आहे

आजकालच्या मुलींचाही अभ्यास दांडगा दिसतोय!   

नाही कौतुक, नाहित वाचक, 'अर्थ'ही नाही
जरी खोडसाळाची रचना मार्मिक आहे

ही तक्रार मात्र दांभिक आहे हं तुमची! असं पाहिजे बघा :

बक्खळ कौतुक, चिकार वाचक, 'अर्थ'च नाही

खरे खोडसाळाचे दुःखच आर्थिक आहे...