माझ्या अंदाजाने हा चित्रपट एक फँटसी आहे. शिवाजी महाराज (चुकून) जर महाराष्ट्रात अवतरले तर काय प्रसंग घडतील याचा कल्पनाविलास या चित्रपटात असावा. शिवाजीच्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्य़ा घटनांचा संदर्भ येथे लावता आला तरी हा चित्रपट ऐतिहासिक दस्तावेज नाही असे वाटते.
वेडात मराठे वीर दौडले.. फक्त सातच बाकीचे कुठे गेले हे वाक्य विनोदी वाटत असले तरी सामान्य प्रेक्षकांना त्यातला (नसलेला) पंच जाणवण्याची शक्यता आहे. ख्वाजा मेरे ख्वाजा सारख्या गाण्यात जपानी आचाऱ्याप्रमाणे दिसणारे कपडे घालून नाच करणारा हृतिक अकबर चाललाच की लोकांना :)
महेश मांजरेकर दारुडा वगैरे असण्याचा शिवाजीची भूमिका वठवण्याशी काहीही संबंध नाही हे टग्या यांनी सांगितलेच आहे. त्याला माझे अनुमोदन आहे. संभाजीची भूमिका करणारे घाणेकर रात्रंदिवस टुन्न असत त्यावर फारसा आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. या उप्पर पुरुष असलेल्या बालगंधर्वांनी स्त्रीभूमिका केल्या होत्याच की.
महेश मांजरेकरची चित्रपट कारकीर्द पाहिली असता वास्तव, निदान, अस्तित्त्व, प्राण जाये पर शान ना जाये, हाथियार वगैरे चित्रपटांमध्ये त्याने प्राधान्याने मराठी कलाकारांना, तंत्रज्ञांना काम दिले आहे. हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नसल्याने यात मराठीची कड घेतल्याचा दुटप्पीपणा केला आहे हा अंदाज बांधण्यात अर्थ नाही असे वाटते.