ऋतिक, अकबर लोकांना चालला?? हे कधी घडले बॉ? गेंगाण्या आवाजात ऋतिकचे संवाद आणि अभिनय म्हणजे अकबर बादशहा हा कोई मिल गया मधील शरीराने वाढलेला पण बुद्धीने न वाढलेला... अरेरे! चुकलं, बिरबल-बादशहाच्या गोष्टीतील बथ्थड डोक्याचा बादशहाच असावा यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.
महेश मांजरेकरने मराठी कलाकार, तंत्रज्ञांना पुढे येण्यास मदत करणे आणि महेश मांजरेकर शिवाजीराजांच्या भूमिकेत फिट्ट बसणे किंवा महेश मांजरेकर चांगला अभिनेता असणे यांचा परस्परसंबंध नाही असे वाटते.