हृतिकच्या रुपातील अकबर लोकांना चालला म्हणजे चित्रपट चालला असे म्हणायचे आहे. (शिवाय अकबराचा चित्रपट ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित अकबराची कथा सांगणारा होता असा दावा चित्रपटनिर्मात्यांनी केला होता.) याउलट मांजरेकरांचा चित्रपट तद्दन मनोरंजक आहे असे वरील संकेतस्थळावरील कमी कपड्यातील आयटम नृत्य, सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांचे क्लोजप पाहता वाटते. (अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळावरील डाऊनलोड्स विभागातील वॉलपेपरे पाहावीत) . त्यामुळे शिवाजीच्या भूमिकेत तो फिट्ट बसतो का याची चिकित्सा करु नये असे मला वाटते. (कारण तसे केल्यास भ्रमनिरासच होईल ;) )

महेश मांजरेकरने मराठी कलाकार, तंत्रज्ञांना पुढे येण्यास मदत करणे आणि महेश मांजरेकर शिवाजीराजांच्या भूमिकेत फिट्ट बसणे किंवा महेश मांजरेकर चांगला अभिनेता असणे यांचा परस्परसंबंध नाही असे वाटते.

सहमत आहे. मांजरेकरचे मराठी प्रेम बेगडी आहे असा वर कोणीसा दावा केला होता त्याबाबत मी हे मत व्यक्त केले आहे. :)