मी वाटच पाहत होतो म्हणायला हरकत नाही. २ वर्ष उत्तरप्रदेशात बरेली आणि (गुन्हेगारीसाठी गाजलेलं) मेरठ (मिरत) ह्या दोन शहरांचा चांगलाच अनुभव घेतला.
१. आवभगत :- आपल्या कडे दिवाळीला फराळाला बोलावतात तेंव्हा एक प्लेट मध्ये वेगवेगळे पदार्थ देतात, ते (उ. प्र. ) लोकं एका मोठ्या ट्रेमध्ये ४-५ छोट्या-छोट्या वाट्यात "नमकिन" म्हणून बिस्किट, शेव, वगैरे ठेवले असतात. सोबत चहा किंवा कॉफी. सुरुवातीला मला माहीती नव्हतं, म्हणून मी सगळंच खाल्लं (त्यावेळी माझं लग्न व्ह्यायच होतं ). मग मला कळलं की ते उपचार म्हणून ठेवले असतात त्यातच त्यांचा "आग्रह" असतो, तो ही ४-६ लोकांना.
जेवायला दहा वेळा म्हणतील, की "आओ कभी घर पे.... खाने पे .... " पण बोलावणार नाही. असो काही लोकं बोलावतात, नाही असं नाही, पण ते इतके पदार्थ असतात आणि तेही सगळे तळिव. आपल्याला मुळिच सवय नसते इतकं खायची. तेलकट किती खाणार ? त्यांच्या घरात खाणारे असतात भरपुर अन आपल्याला कळतच नाही की काय खाव अन काय नाही. मग म्हणतात "अरे तुम मराठी लोग कुछ खातेही नहीन, हम लोग देखो" असो. असो, असे प्रसंग वर्षातून एकदाच येतात . तसं पुण्या-मुंबईवरून मराठी माणसांचे स्वभावाचे विश्लेषण करू नये तसेच मिरत- बरेलीवरून मी ही तेच करू नये.
२. नातेवाईक :- यांच्याकडे एकाचे २ घर होत नाही, कारण त्यांचा मुळ व्यवसाय "धंदा" किंवा शेती आहे. धंद्यात किंवा शेतीत जितके जास्त लोकं असतात, तितका फायदा जास्त असतो. संपत्तीचे वाटे पडू नये म्हणून मोठ्या वहीनीवर भावाच्या मृत्युनंतर "चादर" टाकणे हा ही एक प्रकार असतो. स्त्री, त्यात न शिकलेली किंवा शिकुनही उपयोग नसलेली.... हे आम्हाला म्हणतात की आम्हाला नातेवाईक कमी असतात, वा रे वा .... कित्येक लोकांकडे खायची सोय नसते पण ८-१० पोरं ३-४ भाउ....
३. सामाजिक जीवन :- अति-गरीबी आणि अति-श्रीमंत असे दोनच वर्गीकरण उ. प्र. मध्ये मी बघितले. मजुरी-वेठबिगारी हा प्रकार अजुनही तिथे आहेच. शिकुनही सुधरलेले नाही. "लडकियो को ज्यादा पढाया तो वोह सिर पे बैठती है" हे एका शिक्षण संस्थेच्या प्राचार्यापासून तर अशिक्षीत मोलकरणीपर्यंत सगळ्यांच मत.
कसली प्रगती म्हणायची ही. स्वस्तात म्हणजे ४-६ लाखात लग्न करून कर्जबाजारी होणारे लोकं. बाप IAS आहे म्हणून १० वी पास मुलीशी २५-५० लाख हुंडा घेणारे आणि लग्न करणारे इंजिनिअर / IAS officer / सुशिक्षीत (गाडी, फ्लॅट वेगळा).... ह्या लोकांनी आम्हाला सांगाव ? हास्यास्पद आहे.
४. उत्सव :- यांचे उत्सव म्हणजे दुसऱ्याला त्रास. रोजच्या जिवनात हॉर्न वाजवल्याशिवाय एक इंचही गाडी न चालवणारे लोक, उत्सवात काय करत असतील याची कल्पना करा. म्हणून यांच्याच उत्सवाला दुसऱ्या ठीकाणी विरोध होतो. कानठळ्या बसवेल अश्या आवाजात टीपीकल "हिमेश" प्रकारातील गाणे..... ८ दिवसासाठी दिल्ली - हरीद्वार राष्ट्रीय राजमार्ग केवळ कावड यात्रेसाठी बंद केल्या जातो, मात्र पंढरपुर यात्रेसाठी राष्ट्रीय राजमार्ग बंद केल्याचे मी ऐकले नाही. याच कारण मस्ती आहे, बाकी काही नाही.
५. दिल्लीत आवाज ? उ. प्र. राज्यातून महाराष्ट्राच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट खासदार जातात तरी काय दिवे लावले आहेत ? उगाच दुसऱ्यांना म्हणण्यापुर्वी स्वताचेही दोष बघा म्हणाव.
मराठी लोकं हुशार आहेत, नोकऱ्या करतात, आणि भविष्याची तरतुद करतात, उगाच माज आल्यासारखे वागत नाही, तोंडावर "अरे आप तो आतेही नहिन" म्हणत तोंडपुजल्याप्रमाणे करत नाही, दुसऱ्यांना त्रास देउन सण साजरे करत नाही, हे दोष असतील तर ते हवेतच !