"ती टिंगल होती नव्हते सांत्वन काही
मज कळण्याइतकी नशा साधली नाही

तो शब्दांमागे धावून संपून गेला
पण तिथे जराही गझल थांबली नाही

ते जोडत बसले लघू-गुरूंच्या माळा
पण गाठ कुणी 'अर्थास' बांधली नाही

मी रक्त ओकले मनोरंजनासाठी
पण तहान त्यांची तरी भागली नाही... हे चारही शेर भावले. निव्वळ टीकेसाठी टिका नाही, हे छान साधले आहे.