मराठी आणि अमराठी हा मुद्दा तापला आहे असं म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती सगळ्यांना जाणवत आहे, असं म्हणायला हवं. मुळातच मराठी माणसं आपण बरं आणि आपलं काम बरं अश्या प्रवृत्तीचे, त्यामुळे गोडी-गुलाबी (किंवा पाय चाटणे म्हणा हवं तर) हा प्रकार मराठी लोकांत कमी आहे. पण हे सगळे केवळ आपले दुर्गुण आहेत म्हणून त्यांची संख्या वाढली असं नव्हे, तर जाणिवपुर्वक ही संख्या वाढवल्या जात आहे.
या पार्श्वभुमीवर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज उपदेशाचे डोस पाजणार असतील आणि त्यामुळे काहीतरी चांगलं घडणार असेल तर काय वाईट आहे ? का आपण शिवाजी महाराजांना अश्या भुमिकेत बघायला तयार नाही ? म्हणजे देव देव्हाऱ्यातच बरा. त्याची आम्ही पुजा करू मात्र त्याच्या गुणांचा अंगिकार नाही करणार. म्हणजे काँग्रेसच्या कार्यालयात गांधी आणि सेनेच्या शिवाजी महाराज फोटोपुरतेच बरे, असं तर नाही ना ?
बाकी चित्रपटाला चित्रपटाच्याच भुमिकेतून बघाव हे ही पटेल, पण "त्याने" असं करायला हवं होतं किंवा करायला नको होतं हे म्हणण्यात काही अर्थ नाही. लोकं गरीबी, बॉंबस्फोट, दंगली यांच भांडवल करून पैसा कमावतात तेंव्हा काही वाटत नाही, आणि कोणी मराठी माणसांच्या प्रश्नांवर फँटसी चित्रपट काढत असेल तर त्याला मात्र डोस पाजणे मला पटल नाही. असो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
ता. क. :- नवीन येणाऱ्या चित्रपटांत हा विषय नवीन वाटला, म्हणून मांडला, जाहीरात म्हणून नाही. ह. घ्या.