तुमचा लेख वाचून माझ्या ही आठवणी ताज्या झाल्या.
'बदली', ह्या शब्दाची मला मात्र खूप भीती वाटते. चार वर्षापूर्वी माझी देखील बदली अचानकपणेच मध्यप्रदेश मध्ये पिथंपूर येथे झाली होती. राहणं त्यावेळी इंदूर मध्येच झालं. परंतु सहा महीन्यानंतर परत कामानिमित्त रतलाम येथे बदली झाली तेव्हा एकटाजीव सदाशिव असल्यामुळे घर शोधताना खूप त्रास झाला होता. काम संपल्यावर घरी जायचा ही कंटाळा यायचा. घर खायला यायचे. पायी फिरून-फिरून रतलाम बघणं. हा एकच 'टाईमपास' होता. रतलामला जेवणाचे ही खूप हाल झाले. इंदुरला मात्र मराठीच कुटंबे खानावळ चालवत असल्यामुळे जेवणासाठी तितका त्रास झाला नाही.
लेखाबद्दल धन्यवाद!