संस्कृतमध्ये 'कर्नाटक'ला 'कर्णाटक' म्हणतात, म्हणून वरील निवेदनात 'ण' वापरला हे समजण्यासारखे होते. परंतु टांकणदास एच कटारिया मार्ग(जुना लेडी हार्डिंज रोड) याला श्री.(युत?)कटाऱीया मार्ग का म्हटले ते समजले नाही. कदाचित संस्थेने आपल्या परिपत्रकात तसे म्हटले असावे.  पण दुकान किंवा उपाहारगृहाच्या नावाआधी श्री(श्री. नाही!) लिहितात, पण रस्त्याच्या नावाआधी कधी श्री पाहिल्याचे आठवत नाही. ही कानडी पद्धत आहे का? कदाचित असू शकते!