किती हा काळ वेगाचा; किती हा काळ घाईचा!
स्मरेना चेहरा आता मला माझ्याच आईचा!
फार सुरेख प्रदीपराव.
जुन्या त्या भांडणाची कारणे का शोधशी आता?
इरादा का तुझा आहे नव्याने दिलजमाईचा?
अहाहा... सुंदर
विटेचा प्रश्न कानाआड केला पांडुरंगाने...
'तुला का वीट येईना, अरे एक्याच ठाईचा? '
वा!!!
तसा आतून-बाहेरून काटेरीच आहे मी...
कशाला जीव गुंतावा पुन्हा माझ्यात जाईचा?
क्या बात है...
(शाईचा शेर तितकासा आवडला नाही मात्र) गझल फारच सुंदर.