चर्चेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समाज हा एका वैचारिक पातळीवर येण्याची शक्यता बळावते. ज्यामुळे अकारण संघर्ष टळू शकतात. सध्या सर्वच सामाजिक घटक हे स्वतःच्या गोष्टिंबड्डल (अश्या गोष्टी ज्या त्यांना आदरणिय, पूज्यनिय असतात... ) पराकोटिचे आग्रही झालेले दिसतात. अश्या वेळेस चर्चा केल्याने कुठलीही व्यक्ती किंवा सामाजिक घटक एखाद्या विषयावर टोकाची भूमिका घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो.