चित्रपट केवळ चांगला असून चालत नाही, तर तो चालला पाहीजे !
लोकांची नाडी ओळखून चित्रपट काढण्याचे दिवस आहेत. जसं नाना पाटेकर गुणी अभिनेता असुनही "तिरंगा" किंवा "यशवंत" सारख्या चित्रपटातुनच प्रसिद्ध झाला.
आजकाल सत्य बटबटीत केल्याशिवाय लोकांना त्याचं गांभिर्य कळत नाही, म्हणून कदाचित असे संवाद असण्याची शक्यता आहे. आता तरी लोकं विचार करतील आणि त्यानुसार वागतील, असं झालं तरी पुरेसं आहे.
बाकी "वेडात दौडले.... " चा इतिहास वेगळा आहे आणि चित्रपटात तो वेगळ्या अर्थाने वापरल्या गेला असावा असे वाटते.
गैरसमज नाही पण महेशची चित्रपटातून व्यक्त होणारी आणि प्रत्येक मराठी माणसाची इच्छा यातून पुढे आली तर हवेच, भलेही बटबटीत असो