रस्त्याच्या नावाआधी कधी श्री पाहिल्याचे आठवत नाही.

रस्त्याच्या नावाआधी कधी श्री. पाहिल्याचे मलाही आठवत नाही, परंतु ते वापरू नये असा नियम असावा असेही वाटत नाही.

खाली श्री. अद्वैतुल्लाखान यांनी म्हटल्याप्रमाणे लेडी हार्डिंज रोड चालतो. महर्षी कर्वे मार्ग चालतो. जनरल वैद्य मार्ग चालतो. मग 'श्रीयुत'च का चालू नये?

तसेही नाना चौकाचे अधिकृत नाव 'मुंबईचे शिल्पकार श्रीयुत जगुनाथ ऊर्फ नाना संकेरसेट्ट चौक' असे असल्याबद्दल कोठेसे वाचल्याचे स्मरते. याचा अर्थ चौकाच्या नावात 'श्रीयुत' (अथवा संक्षेपाने 'श्री. ') असणे नियमबाह्य नसावे. चौकाच्या नावात जर चालत असेल, तर रस्त्याच्याच नावात 'श्रीयुत' (अथवा संक्षेपाने 'श्री.') निषिद्ध असणे तर्कास धरून वाटत नाही.