एकाच नावाच्या किंवा आडनावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. रस्त्याला किंवा चौकाला जेव्हा विशिष्ट व्यक्तीचे नाव द्यायचे असते तेव्हा त्या व्यक्तीची नीट ओळख पटावी म्हणून आवश्यक ती उपाधी नावाअगोदर येते.

लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.

मात्र हा नियम रस्त्यांच्या नावांना लागू पडतो, परंतु संस्थांच्या नावांना लागू पडत नाही ही एक गंमतच आहे. जसे, 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ', परंतु 'नाथीबाई ठाकरसी मार्ग'. ('नाथीबाई दामोदर ठाकरसी' या नावाच्या अनेक व्यक्ती असाव्यात असे वाटत नाही. )

नाना चौकाला जे नाव दिले आहे ते सदोषच आहे.

ठीक.

नाव बदलणे हा काही उडाणटप्पू व उपटसुंभ लोकांचा रिकामटेकडा उद्योग असतो.

हम्म्म्... विचार करावा लागेल. (रस्त्यांची नावे बदलण्याच्या बाबतीत हे ठीक असावे. परंतु व्यापक अर्थ घेतल्यास 'लग्नात बायकोचे नाव बदलणारे समस्त नवरे हे उडाणटप्पू आणि उपटसुंभ असतात' असा निष्कर्ष निघू शकतो. या निष्कर्षाबाबत थोड्या अधिक विचाराची गरज आहे. 'उडाणटप्पू' ठीक आहे, पण 'उपटसुंभ'? स्वतःच्याच बायकोच्या बाबतीत? )