जुनं पाहाताना होणारा नवा आनंद म्हणजे गत जन्माचा पुरावा समजावा काय?

पुण्यात तेव्हा ' मराठा' विकणाऱ्या काशिनाथ शेटेंची आठवण झाली... भल्या सकाळी उठून पुणे स्टेशनवरून अंकांचा गठ्ठा घेत...नजर अधू...मुखपृष्ठावरील बातम्या वाचायचे ते अगदी नाकाजवळ पेपर धरून... एक कप चहा घ्यायचा... नंतर खड्या आवाजात हेडलाईन ऐकवीत, पेपर हवेत नाचवीत सुसाट निघायचे... वयानं पन्नाशीच्या पुढे... स्वातंत्र्यवीर... अर्धी चड्डी व मोठ्या खिशाचा अर्ध्या बाहीचा शर्ट...त्यांची वाट पाहात लोक चौकाचौकात उभे असत... स्टेशनपासून बेलबागचौकापर्यंत येण्यापूर्वी हातात एकही पेपर शिल्लक राहात नसे. त्यांची दखल आचार्य अत्रेंनीही घेतली होती!