रोज मी माझ्या मनाला बांधतो एकाच जागी...
पाहतो चोहीकडे मी रोज त्याच्या हालचाली!
एवढा विश्वास कवितेतून शब्दांना मिळावा...
... आणि व्हावे आशयानेही स्वतः त्यांच्या हवाली!
ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता माझ्या कथेची पूर्ततेआधीच झाली! '
तू म्हणे केव्हातरी होतास हिरवागारसुद्धा...
सांग आयुष्या तुझ्या काढू किती सोलून साली?
यावर बोलण्यासारखे काहीच नाही...
...जाणीव फक्त अनुभूतीची! .. ... ..अतिशय आवडली.