"रोज मी माझ्या मनाला बांधतो एकाच जागी...
पाहतो चोहीकडे मी रोज त्याच्या हालचाली!
एवढा विश्वास कवितेतून शब्दांना मिळावा...
...आणि व्हावे आशयानेही स्वतः त्यांच्या हवाली!
ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता माझ्या कथेची पूर्ततेआधीच झाली! '
सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा उदयास आला...
रंगली चर्चा किती ही पाहण्याआधीच लाली! " .... प्रदीपजी, हे अतिशय आवडले. गझल अपेक्षेप्रमाणे छानच !