पाश्चात्य देशात लहानपणापासून मुलांना जवाबदारीची जाणिव करून दिली जाते त्यामुळे कोणतेही काम करताना त्यांच्या विचारात आणि कृतीत एकसंधता येते. ते लोक ऑथेंटीक वाटतात. ते काम म्हणजे काम आणि आराम म्हणजे आराम करतात. आपल्याकडची वागणुकीतली तफावत ही मुलांवर जवाबदारी न टाकल्यामुळे येते. त्यांचा नेता राजकारणही स्वतःची जवाबदारी समजतो त्यामुळे बराक ओबामा सारख्या नेत्यावर ते लोक विश्वास टाकू शकतात.
आपल्याकडे मोठ्याप्रमाणावर दैववाद आहे त्यामुळे प्रचंड मानसिक गोंधळ झाला आहे. वैयक्तिक जवाबदारी सोडून इतर अनेक घटक कृत्याच्या पूर्णतेला आवश्यक आहेत आशी आपली मनसिकता झाली आहे त्यामुळे विचार आणि कृती यात एकसंधता येत नाही. एखादे काम झाले नाही तर त्याचे योग्य कारण शोधण्या ऐवजी एकमेकांवर ढकलाढकली करणे रूढ झाले आहे त्यामुळे ते काम पुढल्यावेळी तरी व्यवस्थित होईल असे होत नाही. या अविश्वासाच्या वातावरणामुळे सगळीकडे अनिश्चीतता वाटते.
मुलांवर त्यांच्या कृत्याची संपूर्ण जवाबदारी टाका म्हणजे त्यांना हे काम मी केले असे वाटेल त्यांच्यात कॉन्फिडन्स येईल आणि आपला समाज एक जवाबदार समाज होईल निराशेचे काही कारण नाही