..... परंतु ही सर्व माहिती प्रा. जयंत नारळीकर यांच्या 'गणितातील गमतीजमती' या पुस्तकातील आहे. आपण हे येथे नमूद करणे व मूळ लेखकाची या संबंधात परवानगी घेणे आवश्यक होते. आपण परवानगी घेतली असेल असे मानले तरीही आपण मूळ लेखकाचे नावही नमूद करावयास हवे. येथे 'कॉपीराईट' कायद्याचा भंग होऊ शकतो.
श्री. निरु,
आज काही कारणाने मला हा लेख वाचावासा वाटला आणि जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आलेला तुमचा प्रतिसादही वाचला.
सर्वप्रथम हे सांगावेसे वाटते की प्रा. जयंत नारळीकरांचे 'गणितातील गमतीजमती' हे पुस्तक मी वाचलेले नाही. लेखात मी लिहिलेल्या गोष्टी ही गणितीय तथ्ये (facts) आहेत. ती मी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तकांत वाचली आहेत. ही सर्व माहिती इंटरनेटवरही उपलब्ध असेल/आहे. वैज्ञानिक किंवा गणितीय तथ्ये सांगण्यामध्ये प्रताधिकाराचा भंग होतो असे मला वाटत नाही.
ह्या लेखातील माझे वैयक्तिक योगदान हे केवळ ही तथ्ये समजावून सांगण्याच्या पद्धतीत आहे आणि ती संपूर्णपणे माझी स्वतःची आहे. मला शाळेत आणि महाविद्यालयात गणित शिकवायला फार चांगले शिक्षक मिळाले होते. त्यांच्या शिकवण्याचा थोडाफार प्रभाव माझ्या समजावून सांगण्याच्या पद्धतीवर पडला असेल. तेव्हा श्रेय द्यायचेच झाले तर मी ते माझ्या त्या गुरुंना देईन.
-मीरा फाटक