प्रिय प्रवासी,

गझल छान आहे. विशेषतः डोळे मिटून तुजला बघण्यात सौख्य आहे. शेरात आमद आहे.

वृत्त लहान असल्याने अनेक मर्यादा येतात. गझल ख़बरिया होण्याचा धोका असतो. अर्थात, अशी गझल दुय्यम गझल, या मताचा मी नाही. दोन ओळींत अनेक शक्यता मांडणे ही अघोरी कला आहे, हे ही तेवढेच खरे.

मला याचे उदाहरण म्हणून एका उस्तादाने उद्धृत केलेला ग़ालिबचा एक शेर आठवला -

तू और आराइशे-ख़मे-काकुल
मै और अन्देशहा-ए-दूरदराज़

 तुमचा,

 चित्तरंजन