अरे बापरे! हा लेख आहे कि एखाद्या वेगवान खेळाची 'रनींग कॉमेंन्ट्री'! लेख वाचताना गड चढताना जशी धाप लागते तशी धाप लागली की मला. सुंदर! अभिनंदन! धन्यवाद!
दोन दिवसा पूर्वीच लोकसत्तेत सचिन ट्रॅव्हलस् ची १० एप्रिल २००९ ला 'बाबासाहेब पुरंदरेंसोबत गडदर्शना' ची जाहीरात आली होती. ती वाचताच 'आपण जायचच' हा निर्धार केला. लगेच फोन ही लावला. काही कारणास्तव तो लागला नाही. नंतर लावू असं ठरवलं. पण जेव्हा कचेरीला जायचं झालं तेव्हा रेल्वेचे ब्रीज चढतानाही आपल्याला धाप लागते, गुढगे दुखतात ही गोष्ट मनात आल्यावर ईच्छा असूनही तो बेत रद्द करावा लागला.