माझा विश्वास आहे कि कोणताही 'विचार' विश्वाच्या पोकळी मध्ये आधी अवतरीत होतो. तो अनेकांच्या मनात डोकावतो. मनात डोकावलेले विचाररुपी बीज फक्त सुपिक डोक्यातच रुजते. कर्तुत्वान व्यक्तीकडे अशा विचारांना अंकुर फुटतात.
प्राप्त झालेल्या विचाराला आकार कसा द्यायचा? तो वाढवायचा कसा हे त्या-त्या व्यक्तीच्या कुवतीवर (व काही प्रमाणात नशिबावर) अवलंबून असते.
अंतरजालावर एखाद्या संकेतस्थळावर एकच लेख अनेक जण वाचतात परंतु काही त्याकडे दुर्लक्ष करतात, काही त्या लेखाचा आस्वाद घेतात, परंतु काही त्या लेखातील माहीतीचा वापर करतात. विचारांचे ही अगदी तसेच असावे.