प्रतिसादातील

नव्या वर्षात मुलींचे जन्म अधिक व्हावेत.

या वाक्याचा, मूळ लेखातील

येणाऱ्या नवीन वर्षात आपण काही नवीन संकल्प केले असतील तर सांगा. कदाचीत त्यामुळे इतरांना पण प्रेरणा मिळेल.

या वाक्याशी नेमका संबंध कळत नाही. आणि मूळ लेखातील इतर कोणत्याही वाक्याशी या वाक्याचा संबंध लागतो असे वाटत नाही.

बरे, प्रतिसादातील त्या वाक्याचा संबंध मूळ लेखातील कोणत्याही वाक्याशी नसून प्रतिसादातीलच

ह्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा

या वाक्याशी आहे, असे म्हणावे, तरीही नीट अर्थबोध होत नाही. बरेच प्रश्न उभे राहतात.

नव्या वर्षी मुलींचे जन्म अधिक व्हावेत अशी 'सर्वांना शुभेच्छा' म्हणजे नेमकी कशी? हे नेमके कसे घडावे अशी अपेक्षा आहे? म्हणजे सर्वांना या वर्षी मुली व्हाव्यात असे? (या वर्षी अपत्यप्राप्तियोग नसला तरीही? ) की या वर्षी सर्वांनी अपत्यप्राप्तियोगासाठी प्रयत्नशील राहून त्यातून सर्वांना (किंवा बहुतेकांना) कन्यारत्नच प्राप्त व्हावे असे? (या वर्षी अपत्यप्राप्तीची इच्छा असो वा नसो, पण अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणे सहज शक्य असावे, परंतु त्यातून 'सर्वांना' कन्यारत्नाचीच फलप्राप्ती होईल याची शाश्वती कशी द्यावी? बरे 'सर्वांना' ऐवजी 'बहुतेकांना' कन्यारत्न व्हावे अशी शुभेच्छा जरी मानली, तर नेमके कोणाकोणाला कन्यारत्न व्हावे आणि कोणाकोणाला पुत्ररत्न झाले तरी चालू शकेल?) की या वर्षी ज्यांना कोणाला अपत्यप्राप्ती होणे प्राप्त आहे अशा सर्वांना किंवा पैकी बहुतेकांना कन्याप्राप्ती व्हावी असे?

बरे, 'सर्वांना शुभेच्छा' म्हणताना या 'सर्वां'मध्ये कोणत्याही कारणामुळे तूर्तास जे विवाहबंधनात नाहीत (अविवाहित, घटस्फोटित, विधुर-विधवा इ. ) अशांचाही समावेश व्हावा काय?

('आपण कशाची इच्छा करतो यावर पूर्ण विचार करावा. कदाचित आपली इच्छा पूर्ण होण्याचा धोका आहे. ' या उक्तीची या निमित्ताने आठवण झाली. )

बाकी अस्तु.