गझल आवडली.

श्वासांचे येरझार सोडा -
खरे कितीसे जगून गेले?
-अप्रतिम!
मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!

आज दवाला गंध निराळा
कोण पाखरू रडून गेले?
 - वा वा! मस्तच.


हळूहळू सावरून गेले...
"काम तुझ्याविन अडून गेले"
 - ह्या ओळींमध्ये "सावरून गेले", "अडून गेले" हे शब्दप्रयोग मराठी नाही तर हिंदी वाटतात. ज्या अर्थाने तुम्ही ते वापरले आहेत तसे मराठीत बोलले जाते का? 'मी सावरले' असे म्हटले जाते. 'सावरून गेले' ह्यावर वर 'कुठे' हा प्रश्न पडतो. हीच गत 'अडून गेले'ची. 'तुझ्यावाचून काम अडले' किंवा 'अडून पडले' असे म्हटले जाते.