तुम्ही लिहिलेल्या बऱ्याच मुद्यांपैकी साहित्यसंमेलनाचा दर्जा, ती भरवण्याची अनावश्यकता, या मुद्यांशी सहमत आहे. यादवांची यत्ता काय ,या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाही कारण मी त्यांचे साहित्य फार वाचलेले नाही.
पण यादवांवर टीका करताना तुम्ही वारकऱ्यांच्या वर्तनाबद्दल फारसे लिहिलेले नाही. त्यांचे हे वागणेही पाठिंबा देण्यासारखे आहे असे वाटत नाही. कायदा हातात घेणे, झुंडशाहीचे प्रदर्शन करणे, टोकाची भूमिका घेणे हे प्रकारही ' म्हातारी मेल्याचे दुःख नाही.... याप्रकारातच मोडतात.
एकंदर प्रस्ताव वाचल्यावर तुम्हाला साहित्यिक, प्रकाशक यांच्याविषयी बरीच आतली माहिती असावी असे वाटते. तसेच प्रस्ताव मांडताना तुमचा आवेश पाहिला असता, साहित्यिकांच्या रणधुमाळीत तुम्हालाही कुठल्यातरी गटाविषयी जास्त आपुलकी आहे वा कोणाविषयी जास्त आकस आहे असा संशय येतो.
स्पष्ट लिहिले असले तरी मला या प्रकरणात, कोणाचीच बाजू बरोबर वाटत नाही. 
हे फक्त वादासाठी, मला जे वाटले ते लिहिले आहे. व्यक्तिशः,  मी तुमच्या लिखाणाचा व कवितांचा चाहता आहे.