फारच सुंदर!
चौदा-सोळा वर्षांपूर्वीच्या कल्लोळाची आठवण झाली... प्रथम आई गेली, दोन वर्षात वडील. त्यानंतर १९९९ साली माझी एक शस्त्रक्रिया झाली. पाडवा होता. डाक्टरांनी आम्हा पेशंटसना पोर्च मध्ये धन्वंतरीच्या मूर्तीसमोर बसवून सपत्निक नमस्कार केला! गलबलवून टाकणारा होता तो प्रसंग ! त्यावेळच्या माझ्या भावना लिहून ठेवलेल्या या निमित्ताने आठवल्या-
तीर्थरूप चरणयुगुले
जिथे मस्तक झुकवावे
एकामागून एक ती
नजरेआड होत गेली-
वासांसी जीर्णानी वगैरे म्हणून
आली परिस्थिती स्वीकारली...
ती पोकळी जाणवलीच नाही ?
शुश्रुषाग्रुहातून ताजी जखम पोटावर घेऊन
घरी परतताना जेव्हां
डाक्टरने सपत्निक वाकून
नमस्कार केला तेव्हां
आठवली ती पोकळी
दिसले माझे पाय त्या पोकळीत
तो दिवस गुढीपाडवा होता!
ते पावित्र्य जपण्याची जबाबदारी
आता शिरावर आलेली...
आता बोडखं राहून चालणार नाही!!!