त्यांनी 'कलेसाठी कातडे' हा जो मलविसर्जनाचा प्रकार केला, तो त्यांची साहित्यातली इयत्ता जी असेल तिच्यात किमान काहीशे पायऱ्यांची घसरण करवणारा ठरला. वैयक्तिक हेवेदावे जमतील तेव्हा आणि तिथे तंडवणे ही मानसिक प्रवृत्ती आहे हे मान्य. पण विरुद्ध बाजूची व्यक्ती शरपंजरी पडलेली असताना (तात्या माडगूळकर तेव्हाना dialysisच्या दुष्टचक्रात अडकले होते; त्यानंतर लौकरच त्यांचे निधन झाले) अशी विष्ठा कागदावर उतरवणे हा स्वतःच्या 'साहित्यिक'पणाचा स्वतःच केलेला शिरच्छेद म्हणावा असे मला वाटते.

ह्याविषयी मला काहीही माहिती नाही, म्हणून विचारत आहे-- 'त्यांनी' म्हणजे कोणी-- यादवांनी का सारडा ह्यांनी? आणि तात्या माडगूळकरांवर कुणी शरसंधान केले?

बाकी तुमच्या सर्वच मतांशी सहमत.

ह्या प्रश्नाचा एक अत्यंत सुंदर आढावा घेतल्याबद्दल धन्यवाद.